महामानवास अभिवादन

अवघे शहर निळेमय; विविध कार्यक्रमांचे आयोजन
महामानवास अभिवादन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर ( Bharat Ratna Dr. Babasaheb Aambedkar )यांच्या १३२ व्या जयंतीसाठी शहर सज्ज झाले आहे. सर्वत्र निळे झेंडे, पताका फडकू लागल्या असून चौकाचौकात महामानवाला मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमांचेे आयोेजन करण्यात आले आहे.

आज नाशिक व नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जयंती उत्सवाला सुरुवात झाली.

या वेळी पालकमंत्री दादा भुसे, समवेत खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, अजय बोरस्ते, माजी खा. समीर भुजबळ, मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पूलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, विनायक पांडे,सुधाकर बडगुजर, माजी आ. वसंत गिते, आनंद सोनवणे, भंते आर्यनाग आदींनी अभिवादन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com