Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउपनद्या, जैव विविधता टिकविण्याची गरज

उपनद्या, जैव विविधता टिकविण्याची गरज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरीकरणाच्या नादात गोदावरी (godavari), गिरणा (girna), दारणाच्या (darna) उपनद्या ओस पडून जैवविविधता (Biodiversity) धोक्यात येत आहे. पात्रातील विविधता जगवण्यासाठी आवश्यक असलेले घटकच संपुष्टात येत असून

- Advertisement -

नदीजवळ आल्याची खूण ही आता लांबूनच येणार्‍या भपकार्‍यावरून येऊ लागली आहे. जेथे दुतर्फा गर्द झाडी गरजेची होती तेथे साचलेला प्लॅस्टीक कचरा (Plastic waste) दिसत आहे. त्यामुळे उपनद्या व त्यातील जैव विविधता टिकविण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्याला (nashik district) गोदावरी, दारणा, गिरणा, कडवा, बाणगंगा, अढुळा, अळवंड , आरम, आळंदी, उंड ओहोळ,कवेरा, काश्यपी(कास), कोलथी, खार्फ , गिरणा, गुई, गोरडी, चोंदी, तांबडी, तान(सासू) दमणगंगा (दावण) धामण ,नंदिनी , नार,पर्सुल, पांंझरा, पार, पिंपरी , पिंपलाद , मुळी, मोसम ,म्हाळुंगी, वडाळी, वाग , वाल, वालदेवी नदी वैनतेय, वोटकी, सासू, सरस्वती, कपिला, अरुणा, वरुणा या उपनद्यांचां वारसा लाभला. त्या टिकल्या असत्या तर आज सर्वत्र जैव विविधता टिकून राहीली असती. मात्र शहरीकरणाच्या नादात त्यां वाळीत टाकल्या गेल्या आहेत. नंदिनी ही गोदावरीची उपनदी, मात्र या नदीचे वाढत्या नागरिकरणाच्या रेट्यात नासर्डी नाला झाला.

ब्रह्मगिरी पर्वतावर (Brahmagiri mountain) उगम पावणार्‍या गोदावरी नदीच्या (godavari river) अनेक उपनद्या नाशिक जिल्ह्यात (nashik district) आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची उपनदी म्हणजे अरुणा नदी. रामशेज किल्ल्यापासून (ramshej fort) अरुणाचा उगम होतो. साडेनऊ ते 10 किमीचे अंतर पार करत या नदीचा संगम रामकुंडात जलाशयाच्या खाली असलेल्या नैसर्गिक गोमुखात गोदावरी नदीत होतो. रामशेज किल्ल्यावरून प्रवाहित होणारी ही नदी पंचवटी (panchavati) येथील इंद्रकुंडात सामावते. इंद्रकुंडात असणारे पाणी हे अरुणा नदीचे आहे.यालाच गोदा-अरुणा संगमही म्हटले जाते.येथेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे शाहीस्नान होते.

सिंहस्थ कुंभमेळा भरणार्‍या प्रत्येक ठिकाणी संगम आढळतो. त्यामुळे अरुणा आणि गोदा या संगमास देखील आध्यात्मिक दृष्टया अमाप महत्त्व आहेृ. नदी प्रवाहावर झालेली बांधकामे आणि अयोग्य नियोजनामुळे अरुणा नदी गायब झाली. तिचे अस्तित्वच दृष्टीपथात येत नसल्याने महत्त्वपूर्ण असलेल्या अरुणा नदीचे महत्त्वच संपुष्टात येत आहे.

उपनद्यांचे पात्र सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग व जलपर्णींचे वसतिस्थान झाले. जैवविविधता मागे पडत आहे. स्थानिक जातीचे मासे, खेकडे, कालवं-शंख, पाणसर्प, बेडूक, कंद मुळांच्या साथीने जगणारे बगळे-पाणकोंबड्या-वेडा राघू-सुतार पक्षी काठावर दिसायचे. पात्रातील विविधता जगवण्यासाठी आवश्यक असलेले घटक त्यात होते.

आता तेच न राहिल्याने त्यांनीही येथे फारकत घेेतली आहे.नदीजवळ आल्याची खूण ही तिच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली दाट झाडी असायची.आता ते दर्शनही दुर्मीळ झालेे. नद्यांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करणारे लोक अल्पसंंख्य झाले आहेत. हेच गोदावरी, दारणा गिरणा, मांजरा, पांझरा,आरम या प्रमुख नद्यांचे व त्यांच्या 39 उपनद्यांंचे दु:ख आहे.

नद्यांचे जलजीवन चक्र व्यवस्थित सुरु ठेवायचे असेल तर सर्व प्रथम नदीत सोडले जाणारे सांंडपाणी प्रथम बंद केले पाहिजे.तसेच त्यातील वाळू उपसा जो भरमसाठ केला जातो.त्याला आळा घातला पाहिजे.आणि काँक्रीटीकरण तातडीने बंद केले पाहिजे. तरच नद्या व उपनद्यां आपण वाचवू शकतो. अन्यथा हे असेच दुष्टचक्र सुरु राहील.

निशीकांत पगारे, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, नाशिक

नद्यां जिवंंत ठेेवण्यासाठी घराघरातील वाहून जाणारे सांंडपाणी नदीत मिसळणे सर्वप्रथम बंदं करणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंच सातत्याने पाठपुरावा करत आहे. सांडंपाणी बंद केले. प्लास्टिक साचणार नाही याची व्यवस्था केली.व नदी काठ कायम सुशोेभीत ठेऊन तेथे कचरा जाणार नाही याची व्यवस्था करावी यासाठी आमचा आग्रह आहे.

– उदय थारोत, अध्यक्ष पर्यावरण सवर्धन राष्टीय मंच, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या