आदिवासी बांधवांमुळे वनसंस्कृती जतन - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

सोनोशी येथे भांगरे, बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन
आदिवासी बांधवांमुळे वनसंस्कृती जतन -  राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

घोटी । वार्ताहर Ghoti

जल, जंंगल व जमीन Forest यांचे संरक्षण खर्‍या अर्थाने या भूमीतील आदिवसी Tribals बांंधवांनी केले आहे. या देशाचा मूळमालक हा आदिवासी आहे. त्यानी सामाजिक न्यायासाठी मोठा संघर्ष केला असून आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे Proto-revolutionary Raghoji Bhangre यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे.त्यांचा आदर्श घेत बिरसा ब्रिगेड Birsa Briged हे देशपातळीवर चांगले काम करत असून ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांनी केले.

सोनोशी येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती उत्सावानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आद्य क्रांतीकारक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे आणि स्मारककामाचे भूमिपूजन झालेे.

यावेळी व्यासपीठावर या प्रसंगी व्यासपिठावर विधानसभेचे नरहरी झिरवाळ, राज्य गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सिन्नर मतदार संघाचे आमदार माणिकराव कोकाटे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, सुनिल भुसारा, रंजना पावरा, आमदार किरण लहामटे, धनंजय पवार, माजी आमदार निर्मला गावित, माजी खासदार देविदास पिंगळे, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंडम, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शिवसेनेचे उप जिल्हाध्यक्ष निवृत्ती, जाधव, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, राहीबाई पोपरे, जि. प. सदस्या सिमितींनी कोकाटे, सरपंच काशिनाथ कोरडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, आदिवासीच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आदिवासी कधी नक्षली होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेतले आहे त्यावेळी ते म्हणाले की हे रयतेचे राज्य आहे. तसेच सर्व समाजाने राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांचा आदर्श सर्वांनी जपला पाहिजे व सत्याची कास धरून जिथे अन्याय होत आहे तिथं झटण्यासाठी काम करा असे ते म्हणाले. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी गेल्या अधिवेशनात सोनोशी येथील 50 एकर जमिनीवर 100 कोटीचे भव्य स्मारक मंजुर केले आहे.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. सरपंच काशिनाथ कोरडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com