Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआदिवासी विकास विभागाचा विद्यार्थ्यांसाठी 'हा' उपक्रम

आदिवासी विकास विभागाचा विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आदिवासी विकास विभाग (Department of Tribal Development) अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधून शैक्षणिक गुणवत्ता (Educational quality) वाढावी, यासाठी

- Advertisement -

आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे (Tribal Development Commissioner Nayana Gunde) यांनी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक गुणवत्ता कक्ष कार्यान्वित झाला आहे.

आश्रमशाळांच्या अधिक चांगल्या शैक्षणिक कामगिरीकरीता विविध शैक्षणिक मुद्यांवरील चर्चा व त्यावर आधारित उपक्रम तयार करणे, विविध विषयातील संकल्पना संबोध सुलभ पध्दतीने समजावुन सांगण्यासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती व त्याची उपलब्धता करून देणे, शिक्षकांमध्ये सतत व्यावसायिक सुधारणा घडवुन आणण्याकरीता शिक्षण कक्षाची (Study room) स्थापना करणे.

या हेतुने या शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची (Academic Quality Cell) स्थापना प्रत्येक प्रकल्प कार्यालयात करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता कक्षांतर्गत सर्व प्रकल्प कार्यालये मिळून सध्या ५३ विषयमित्र कार्यरत आहेत. विषयमित्र यांची निवड तीन विविध टप्प्यांमधून झाली आहे. ह्या सर्व त्रेपन्न विषय मित्र यांना राज्यस्तरावर प्रशिक्षण तसेच विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळांना शाळाभेटीचे आयोजन केले जाते.

हेच प्रशिक्षण प्रकल्प (Training project) स्तरावर दर महिन्यातून शिक्षकांना त्यांच्या केंद्रानिहाय एक दिवसात देण्यात येते. सर्व प्रकल्पांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे एकाच दर्जाचे आहे. एक दिवसीय प्रशिक्षण हे पारंपारिक प्रशिक्षण पद्धतीतील नसून शैक्षणिक उत्सवाच्या स्वरुपात असते. त्यामुळेच ह्याला एज्युफेस्ट (Edufest) अस म्हटले जाते. या एज्युफेस्ट करिता त्या-त्या प्रकल्पातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांचे प्राथमिक शिक्षक दोन टप्प्यात येतात. राज्यस्तरावर अशाप्रकारे प्रशिक्षण देण्याची विभागाची ही पहिलीच वेळ आहे.

ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या एज्युफेस्टमध्ये (Edufest) निपुण भारत अभियानांतर्गत समजपूर्वक वाचन आणि गणनपूर्व संकल्पना हा घटक घेण्यात आला होता. त्यानंतर सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, इंग्रजी वर्ग अध्यापन, अध्ययन अक्षमता लक्षणे आणि त्यासाठी अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानावर आधारित सत्रे, नवनवीन शैक्षणिक उपक्रम (Educational activities) ह्यावर सर्व प्रकल्पात ह्या शैक्षणिक वर्षात एज्युफेस्ट पार पडल्या. पुढील शैक्षणिक वर्षात अध्ययन अक्षमता, सामाजिक भावनिक शिक्षण, तंत्रज्ञान, असे अनेक विषयावर एज्युफेस्ट होणार आहेत.

शैक्षणिक गुणवत्ता (Educational quality) कक्षाअंतर्गत अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रम देखील साजरे केले जातात. यंदा १४ जानेवारीला भूगोल दिन (Geography Day) अत्यंत उत्साहात पार पडला. यासाठी विद्यार्थ्यांना स्थानिक भौगोलिक भूरूपे, घटना, पीके, पक्षी, प्राणी, किल्ले, गड हे विषय देण्यात आले होते.२७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यानी लिहिलेल्या कथा,

कविता यांचे हस्तलिखित शाळा स्तरावर प्रकाशित करण्यात आले.२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आणि अंधश्रद्देमागील विज्ञान यावर नाट्यीकरण , प्रयोग सादरीकरण प्रत्येक शाळेत सादर झाले. आदिवासी विकास विभागाच्या ह्या उपक्रमाचे सर्वच शिक्षक , पालक यांचे कौतुक होत आहे.

शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या यशस्वितेसाठी आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त मुख्यालय तुषार माळी (Additional Commissioner Headquarters Tushar Mali) आणि उपायुक्त अविनाश चव्हाण (Deputy Commissioner Avinash Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक समन्वयक म्हणून अमृता भालेराव या कामकाज करतात. प्रशासकीय समन्वयासाठी वर्षा सानप (सहाय्यक प्रकल्प अधिकारी , शिक्षण ) आणि नानजी भामरे (शिक्षण विस्तार अधिकारी ) कामकाज बघतात. ह्या कक्षासाठी लीडरशिप फॉर इक्विटी ही संस्था विनामुल्य तत्त्वावर मूल्यमापन आणि संनियंत्रण यासाठी सहकार्य करत आहे.

“ राज्यस्तरावरून सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षकांना एज्युफेस्टच्या माध्यमातून महिन्यातून एक दिवस हा शैक्षणिक उत्सव होणार आहे. अनेक वेगवेगळे विद्यार्थीकेंद्रित उपक्रम ह्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व एज्युफेस्ट मधील घटकांचे आयोजन आमच्याच विभागातील विषय मित्र म्हणून निवड झालेल्या विषय शिक्षकांनी केले याचे कौतुक आहे.”

– नयना गुंडे, आयुक्त , आदिवासी विकास , महाराष्ट्र राज्य , नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या