Friday, April 26, 2024
Homeनाशिकधावत्या दुचाकीवर अचानक कोसळले झाड; बालंबाल बचावला दुचाकीस्वार

धावत्या दुचाकीवर अचानक कोसळले झाड; बालंबाल बचावला दुचाकीस्वार

नाशिक | प्रतिनिधी

अशोक स्तंभाकडून गंगापूर रोडच्या दिशेने जाताना केटीएचएम महाविद्यालय परिसरात अचानक दुचाकीस्वाराच्या अंगावर झाड कोसळले. मात्र, या घटनेत दुचाकीस्वार बालंबाल बचावला आहे. किरकोळ दुखापत त्याला झाली असून दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झालेले दिसून आले.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक दुचाकीस्वार अशोक स्तंभाकडून गंगापूररोडकडे निघाला होता. मॅरेथॉन चौकात हा दुचाकीस्वर आल्यानंतर अचानक एक झाड रस्त्यावर आडवे पडले.

दुचाकी पूर्णपणे झाडाच्या खाली दबली गेल्यामुळे दुचाकीस्वाराला मोठी दुखापत झाली असावी असे सर्वांना वाटत होते. मात्र, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत दुचाकीवरून उडी घेतली होती. त्यामुळे किरकोळ दुखापत या दुचाकीस्वाराला झाली. यादरम्यान, दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल स्थानिकांनी दाखल केले.

घटना घडल्यानंतर नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रस्त्यावर आडवे पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीला मोकळा करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या