Saturday, April 27, 2024
Homeनाशिकग्रामीण भागातील रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

ग्रामीण भागातील रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील रुग्णांसाठी मविप्रच्या डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये शंभर बेडची व्यवस्था केली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार असून ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागातील रुग्णांची शहरात फिरवाफिरवी केली जाणार नाही.

- Advertisement -

ग्रामीण भागातून अत्यवस्थ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक व वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे आणल्या जाणार्‍या रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या वाढत्या तक्रारी चिंताजनक आहेत. तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात आलेल्या रुग्णांना या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती.

काही रुग्णांच्या बाबतीत अत्यवस्थ स्थितीत त्यांना नाशिक येथे हलविण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून संदर्भित केले जाते. रूग्णांना मात्र प्रत्यक्षात नाशिक शहरामध्ये दाखल करून घेतले जात नाही. सामान्य रुग्णालयाची स्थापना ही ग्रामीण जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी झालेली असताना याच नागरिकांना या सेवेपासून संकटकाळात वंचित रहावे लागते आहे, असे त्यांनी सांगितले होते.

त्या पार्श्वभुमीवर बेडची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहे. त्यानूसार डॉ.मविप्र व एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात शंभर बेड वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील भार हलका होईल.

मविप्र व एसएमबीटी रुग्णालयात बेडची संख्या वाढवली जात आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील भार हलका होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास अधिक बेड उपलब्ध होईल.

– डॉ.अनंत पवार, आरएमओ

- Advertisment -

ताज्या बातम्या