एसटी महामंडळाचे खाजगीकरण, परिवहन मंत्री परब म्हणाले...

एसटी महामंडळाचे खाजगीकरण, परिवहन मंत्री परब म्हणाले...

मुंबई

विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी (St workers Strike) संपावर आहेत. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात एका एजन्सीची नियुक्ती केली आहे. यावर आता परिवहन मंत्री अनिल परब (anil parab)यांनी खाजगीकरणाचा पर्याय खुला असल्याचे सांगितले.

एसटी महामंडळाचे खाजगीकरण, परिवहन मंत्री परब म्हणाले...
एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही: पवारांचे स्पष्ट मत

अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण वगळता इतर सर्व मागण्या मान्य केल्यानंतरही कर्मचारी आपल्या भूमिकेवर अडून बसले आहेत. त्यांची विलिनीकरणावरची भूमिका ठाम असल्यामुळे उच्च न्यायालयाने नेमलेल्या कमिटीनुसार ते विलिनीकरण बाबतीत निर्णय घेणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या (St workers Strike)संदर्भात आपण कोणत्या पर्यायांचा वापर करू शकतो. याबाबत आम्ही चर्चा केल्या आहेत. तसेच या तपासाची सूचना मी आमच्या कन्सल्टन्सी कंपनीला दिली आहे. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्चाबाबात चर्चा केल्याची अनिल परबांनी माहिती दिली आहे. तसेच उपलब्ध पर्यायांमध्ये खाजगीकरण हा सुद्धा एक पर्याय आहे. परंतु एसटीच्या खाजगीकरणाचा कुठलाही विचार अद्यापही केला नाही. सरकार म्हणून देखील लोकांची जबाबदारी आमच्यावर आहे.

एसटी महामंडळाचे खाजगीकरण, परिवहन मंत्री परब म्हणाले...
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

आंदोलन नेतृत्वहीन

चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना एसटी कर्मचारी युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे. आंदोलन नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com