पोलीस अधीक्षक पाटील, उपायुक्त बारकुंड यांची बदली

पोलीस अधीक्षक पाटील, उपायुक्त बारकुंड यांची बदली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil) व आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड (Deputy Commissioner Sanjay Barkund) यांच्यासह राज्यातील 24 उपायुक्त व अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची बदली करून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी दिले. तसेच इतर 19 अधिकार्‍यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आली नाही.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली असून गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांची धुळे पोलिस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. दोनही अधिकार्‍यांच्या जागी अद्याप कुणाचीही नेमणूक झाल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com