शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा कोणत्या पोलीस स्टेशनला कोणते अधिकारी

शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा कोणत्या पोलीस स्टेशनला कोणते अधिकारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील पंचवटी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सिताराम कोल्हे (Sitaram Kolhe) तर म्हसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून भारतकुमार सूर्यवंशी (Bharatkumar Suryavanshi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे....

शहर पोलीस आयुक्तालयाला नवीन सहायक निरिक्षक, उपनिरिक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले आहे. यामध्ये तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्याच्या पोलीस मुख्यालयाकडून करण्यात आलेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत (Ashok Bhagat) यांची काही दिवसांपुर्वीच पोलीस अकादमीत बदली करण्यात आली होती.

आता तेथून ठाणे शहरात त्यांची बदली झाली आहे. तसेच पोलीस निरिक्षक भरतसिंग पराडके (Bharatsingh Paradke) यांना नाशिक पोलीस आयुक्तालयातच मुदतवाढ देण्यात आली आहे.

यांची झाली बदली

पंचवटी पोलीस ठाणे : डॉ. सीताराम कोल्हे

भद्रकाली पोलीस ठाणे : संभाजी निंबाळकर

सरकारवाडा पोलीस ठाणे : सुनील जाधव

मुंबई नका पोलीस ठाणे : भगीरथ देशमुख

गंगापूर पोलीस ठाणे : रियाझ शेख

इंदिरा नगर पोलीस ठाणे : श्रीपाद परोपकारी

नाशिक रोड पोलीस ठाणे : अनिल शिंदे

उपनगर पोलीस ठाणे : निलेश माईणकर

शहर वाहतूक शाखा : साजन सोनवणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com