पोलीस अकादमीच्या संचालक दोरजे यांची बदली; पाहा कोण आहेत नवे संचालक

पोलीस अकादमीच्या संचालक दोरजे यांची बदली; पाहा कोण आहेत नवे संचालक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बी. जी. शेखर (B. G. Shekhar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नाशिक परिक्षेत्र हे महानिरीक्षक श्रेणीतील पद होते. आता त्यामध्ये पदानत करून उपमहानिरीक्षक पद करण्यात आले आहे.

यासोबतच महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे (Ashwati Dorje) यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर राजेश कुमार मोर नवे संचालक असणार आहेत....

गृह विभागाने काढलेल्या बदली आदेशात राज्यातील २३ भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचे पदावनत करून त्याठिकाणी विशेष पोलीस उपमहनिरीक्षक हे पद करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांची बदली सहपोलीस आयुक्त नागपूर शहर येथे झाली असून त्यांच्या जागी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले राजेश कुमार मोर यांची नियुक्ती झाली आहे.

तर प्रताप दिघावकर यांच्या सेवापूर्तीनंतर रिक्त असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाचे पदावनत करून त्या जागी बी जी शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बी जी शेखर हे नवी मुंबई गुन्हे शाखेत अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com