पोलीस दलातील १७ निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस दलातील  १७ निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलीस दलातील (Nashik police force) एकूण 17 पोलीस निरीक्षकांच्या (Police inspector) बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच 10 सहायक पोलीस निरीक्षकांचीही बदली झाली आहे...

म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे (Pandharinath Dhokne) यांची नाशिक ग्रामीण पोलीस दलात बदली झाली आहे. तर शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक अनिल पवार (Anil Pawar) यांची बदली नाशिक ग्रामीण येथे झाली आहे तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत (Ashok Bhagat) यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीत झाली आहे.

नाशिकमधील (Nashik) सर्वाधिक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (anti corruption bureau) पदस्थापना देण्यात आली आहे. राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल (Kulwant Kumar Sarangal) यांनी या बदल्यांचे आदेश काढून पदस्थापना केल्या आहेत.

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कंसात आधीचे व नियुक्तीचे ठिकाण)

अशोक भगत (नाशिक शहर ते महाराष्ट्र पोलीस अकादमी), पंढरीनाथ ढोकणे(नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण), प्रिया थोरात (महाराष्ट्र पोलीस अकादमी ते मुंबई शहर), नंदकुमार गायकवाड (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), विश्वजित जाधव (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग),

सुहास देशमुख (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अनिल लोखंडे (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), आनंद निकम (नाशिक ग्रामीण ते ठाणे शहर), संजय महाजन (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सुनिल गोसावी (नाशिक ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), नम्रता देसाई (नाशिक शहर ते गुन्हे अन्वेशन विभाग), गुलाब जाधव (महाराष्ट्र पोलीस अकादमी ते नाशिक शहर),

भरतसिंग पराडके (नाशिक शहर ते महाराष्ट्र पोलिस अकादमी), अनिल पवार (नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण), दिनकर कदम (अजप्रतस नाशिक ते नाशिक शहर), सुरेखा पाटील (अहेर) (अजप्रतस नाशिक ते नाशिक शहर), स्वाती कुराडे (राज्य गुप्तवार्ता ते नाशिक शहर), इंद्रजित राऊळ (महाराष्ट्र पोलीस अकादमी ते नाशिक शहर).

इतर जिल्ह्यातून आलेले नवे पोलीस निरीक्षक

शिवराम गवळी (नंदूरबार ते नाशिक अजप्रतस), काशीनाथ जाधव (ठाणे ते नाशिक शहर), शिवाजी देशमुख (औरंगाबाद ते नाशिक ग्रामीण), यशवंत बाविस्कर (यवतमाळ ते नाशिक ग्रामीण), जयंत राऊत (बीडीडीएस अमरावती ते महा. पोलीस अकादमी),

संजयकुमार गावित (विसुवि ते नाशिक शहर), संजय गायकवाड (पो. प्र. केंद्र, जालना ते नाशिक ग्रामीण), युवराज पत्की (नागपूर ते नाशिक शहर), ज्योती आमने (गुअवि ते नाशिक शहर), दिलीप ठाकूर (नागपूर ते नाशिक शहर).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com