Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याप्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

डांगसौंदाणे | वार्ताहर Dangsaundane

येथील वीज उपकेंद्रातील प्रशिक्षणार्थी कर्मचारी (Trainee wire man) व डांगसौंदाणे (Dangsaundane) येथील रहिवाशी असलेल्या राजकुमार दिपक गांगुर्डे (वय 21) याचा आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. गांगुर्डे दगडी साकोडे गावाजवळ विद्युत ट्रान्स्फरमरचे काम करत होता. याच वेळी विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला….(Trainee wire man dies due to transformer shock at dangsaundane)

- Advertisement -

या घटनेने डांगसौंदाणे परीसरावर शोककळा पसरली आहे. यातील दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबन व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गावातील ग्रामस्थ व तरुणांनी केली. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी विद्युत उपकेंद्राच्या आवारात तब्बल 4 ते 5 तास ठिय्या आंदोलन केले.

कार्यकारी अभियंता सतिश बोंडे (Satish Bonde) यांना घटनस्थळावर बोलविण्यात आले. यातील दोषी लाईनमन, वरिष्ठ तंत्रज्ञ, विद्युत ऑपरेटर, तर स्थानिक अभियंता यांचे निलंबन करण्यात यावे तरच मृत युवकावर अंतिम संस्कार करण्यात येतील अशी भुमिका ग्रामस्थांनी व तरुण वर्गाने घेतल्याने काही काळासाठी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.

सटाणा पोलिसांनी (Satana Police Station) घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणत संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञ व ऑपरेटरला तात्काळ निलंबन करीत असल्याचे सांगण्यात आले.

जे कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा शब्द कार्यकारी अभियंता सतिश बोंडे यांनी ग्रामस्थांना व तरुण वर्गाला दिल्याने मृत राजकुमार गांगुर्डे वर डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

राज गांगुर्डे येथील दीपक सीताराम गांगुर्डे यांचा एकुलता एक मुलगा होता. नुकताच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतून इलेक्ट्रिशियनचे शिक्षण पुर्ण करून डांगसौंदाणे विद्युत उपकेंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता.

मात्र, सकाळी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करत साकोडे येथे नेमणूक असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष शिरसाठ या कर्मचारीने राज गांगुर्डे याला साकोडे येथील ट्रान्स्फार्मर दुरूस्तीसाठी पाठवले.

मात्र, विद्युत उपकेंद्रात (MSEB Office) कार्यरत असलेल्या ऑपरेटरने जो वीज पुरवठा बंद करणे गरजेचे होते तो न केल्याने राज याला ट्रान्सफार्मवर चढताच विजेचा जोरदार झटका बसला.

याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी जमली होती. यावेळी संतप्त जमावाने संबंधित दोषींवरील कार्यवाहीची मागणी लावून धरत राजकुमार गांगुर्डे ला कायस्वरूपी कर्मचारी प्रमाणे विजवीतरण कंपनीने भरपाई देण्याची मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या