Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशतब्बल ८ वर्षांनंतर भारत-नेपाळ दरम्यान धावणार रेल्वे

तब्बल ८ वर्षांनंतर भारत-नेपाळ दरम्यान धावणार रेल्वे

दिल्ली | Delhi

तब्बल ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारत आणि नेपाळ दरम्यानची रेल्वे सेवा (India-Nepal Passenger Rail Service) पुन्हा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउवा (Sher Bahadur Deuba) यांनी या रेल्वे सेवेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.

- Advertisement -

दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथून पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि पंतप्रधान मोदींनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. प्रवाशांसाठी ही रेल्वे सेवा उद्यापासून म्हणजेच ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. जयनगर-जनकपूर दरम्यान ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.

भारत आणि नेपाळ दरम्यान DMU रेल्वे धावेल. या रेल्वेचा वेग १४० किमी असेल. मधुबनीच्या जयनगर-कुर्थादरम्यान धावणाऱ्या रेल्वेमध्ये १६०० HP इंजिन बसवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीनुसार आधुनिकीकरण केले आहे. रेल्वेच्या प्रत्येक डब्यात एक टॉयलेट आहे. एकूण पाच डब्यांपैकी एक एसी कोच आहे. एका ट्रेनमध्ये ११०० प्रवासी प्रवास करू शकतात.

नेपाळला जाण्यासाठी भाडेही निश्चित करण्यात आले असून, प्रवासासाठी सामान्य वर्गाचे भाडे ५६.२५ रुपये असेल तर एसी कोचचे भाडे २८१.२५ रुपये असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या