
नवी दिल्ली | New Delhi
पाकिस्तानमध्ये (Pakistan) रेल्वेत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे, या स्फोटात (Blast) दोन जणांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी असल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
क्वेट्टाला (Quetta) निघालेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये (Jaffar Express) हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे चिचावतनी (Chichawatni) स्थानकातून जात असताना हा स्फोट झाला.
ही रेल्वे पेशावर (Peshawar) येथून आली होती. स्फोटानंतर (Blast) ट्रेनमध्ये प्रवाशांची एकच धावपळ सुरु झाली होती. या रेल्वेच्या चौथ्या बोगीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
एक प्रवाशी सिलेंडर (cylinder) वॉशरुमजवळ घेऊन गेला होता. याच सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि रेल्वे ट्रॅक बंद केला गेला. पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत असल्याचे समजते.