'या' भागांत वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक विभागाला उपाय सापडेना

'या' भागांत वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक विभागाला उपाय सापडेना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मेनरोड (Main Road) येथील धुमाळ चौक ते दहीपुलापर्यंंतचा रस्ता अगोदरच अरुंद असतांना त्यात पुन्हा चार चाकी वाहनांची भर पडत असल्याने

पादचा़र्‍यांना वाहतूक कोंडीला (traffic jam) नित्य सामोरे जावे लागत आहे. वाहतूक विभागाने (Department of Transport) अनेक उपाय योजना केल्या परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत.

रोज सांयंकाळी मेनरोडवर नाशिककर (nashikkar) खरेदीसाठी गर्दी करत असतात. त्यातच दुचाकी (bike) पासून ते चार चाकी वाहने घुसतात. हातगाडयांवरील व्यवसायीक गर्दी करतात. अनेक व्यावसायिकांचे विक्रीसाठी हँगरला लावलेले कपड्यांनी तर थेट अर्ध्या रस्त्यावरच अतिक्रमण (Encroachment) केलेले असते.

त्यामुळे एकालाही धड चालता येत नाही. एखादे वाहन जरी रस्त्यात अडकले की रांगा लागतात. आवाजाचे व हवेचे प्रदुषण (Air pollution) होऊन परीसरातील नागरिकांंना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ठऱावीक वेळी येथे मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी करुन पर्यायी मार्ग उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com