Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रvideo कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, अनेक प्रवासी अडकले

video कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, अनेक प्रवासी अडकले

औरंगाबाद- Aurangabad

चाळीसगाव (chalisgaon) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील (Kannad Ghat) वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत.

- Advertisement -

Video चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, डोंगरी व तितुर नदीला महापूर

औरंगाबाद Aurangabad धुळे Dhule महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात Kannad Ghat प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच असल्याने नागरिकांनी चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

अनेक गावांशी संपर्क तुटला

कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.

चाळीसगाव-कन्नड भागात ढगफुटी

जळगावातील चाळीसगाव आणि औरंगाबादेतील कन्नड तालुक्याच्या सीमा भागात ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव Lake फुटला. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे.

हवामानाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

औरंगाबाद, पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या