Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजंक्शन ट्रायलबाबत व्यापारी महासंघ आक्रमक

जंक्शन ट्रायलबाबत व्यापारी महासंघ आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या तीन दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) जंक्शन विकास ट्रायल रन (Trial run) सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार कारंजा येथे ही रन घेण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीचा (Traffic) पुरता फज्जा उडालेला असून नागरिकांना वाहतूक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यातच व्यापारी महासंघाने तीव्र निषेध नोंदवत उद्या (दि.15) रोजी स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More) यांची भेट घेणार आहे…

- Advertisement -

दरम्यान, शहरातील जुनी बाजारपेठ असलेल्या या रविवार कारंजाची (Ravivar Karanja) मुख्य समस्या ही पार्किंगची (Parking) आहे. येथे असलेल्या यशवंत मंडई येथे प्रस्तावित वाहनतळ आहे; त्याचे काम प्राधान्याने करायचे सोडून नवनवीन प्रकल्प हाती घेतला जात आहे.

आम्हाला या जंक्शन विकास नावाच्या स्मार्ट सिटीच्या कामातून रविवार कारंजाचे वाटोळे करायचे नाही. शहराच्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला असता रविवार कारंजावर कोणतेही काम व्यावसायिकांना विश्वासात घेतल्याशिवाय करू देणार नाही.

या कारंजाची गरज पार्किंगची आहे. त्यामुळे बहुमजली पार्किंग आधी करावी आणि मग या विकासकामाबद्दल व्यावसायिकांना विश्वासात घ्यावे, तरच काम करू दिले जाईल, असे नाशिक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले आहे.

दरम्यान, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आज (दि.15) रोजी सकाळी 11 वाजता रविवार कारंजा येथे जमणार असून, यावेळी निषेध नोंदवत ते स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या