
सटाणा । प्रतिनिधी | Satana
सटाणा (satana) - दोधेश्वर (Dogheshwar) रस्त्यावरील घाटामध्ये झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने (tractor trolley overturned) झालेल्या अपघातात (accident) येथील बागलाण (Baglan) अॅकेडमीच्या एका प्रक्षिणार्थीचा (student) मृत्यू झाला तर इतर सुमारे 40 प्रशिक्षणार्थी जखमी झाले आहेत. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
दोधेश्वर येथील महादेव मंदिर परिसरात श्रावण सोमवारनिमित्त होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी गेलेल्या बागलाण अॅकेडमीचे प्रशिक्षणार्थी (Trainees of Baglan Academy) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून सटाणा (satana) शहराकडे येत असतांना दोधेश्वर घाटाच्या वळणावर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात (accident) बहुतांशी प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाले तर नीलेश बापू कन्नडे (20, रा. निमशेवडी) हा प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी पडला.
या अपघाती माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या आ. दिलीप बोरसे, पो.नि. सुभाष अनमुलवार, सपोनि किरण पाटील आदींसह पोलिसांनी (police) तसेच परिसरातील ग्रामस्थांनी अॅम्ब्ल्युलन्ससह मिळेल त्या वाहनावर सटाणा ग्रामीण रूग्णालयात (Satana Rural Hospital) पोहचविले.
15 ते 20 प्रशिक्षणार्थी अधिक गंभीर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण रूग्णालयासह शहरातील खाजगी रूग्णालयात संबंधितांना हलविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सटाणा ग्रामीण रूग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. काहीकाळ तणाव निर्माण झाल्याने पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.