Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापोलिसांकडून टोईंग कारवाईच्या हालचाली?

पोलिसांकडून टोईंग कारवाईच्या हालचाली?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराचा झपाट्याने विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्याही वाढत असून वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस दलातील मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत पार्किंग तसेच वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पोलीस प्रशासनाने टोईंग कारवाई बंद केल्याने बेशिस्त पार्किंगची समस्या वाढली आहे. त्यामुळे टोइंग कारवाईसह इ-चलन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान टोईंगची निविदा प्रक्रिया पोलीस प्रशासनाने सुरू केल्याचे समजते.

- Advertisement -

नाशिक शहरात वाहनतळांची कमतरता असल्याने पार्किंगची समस्या गंभीर बनली असून बेशिस्तपणे वाहने पार्क करणार्‍या वाहनधारकांवर कारवाईसाठी ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाईला मर्यादा येत असल्याने शहर पोलिसांकडून पुन्हा टोइंग सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. लवकरच निविदा प्रक्रियेद्वारे नवीन ठेकेदारास हि जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते. टोईंगकारवाई बंद असल्याने बेशिस्त चालकांकडून वाहने नो-पार्किंगमध्ये लावण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

नाशिकहून ‘या’ पाच शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

शहरातील मुख्य चौक असलेल्या द्वारका तसेच शालिमार, सारडा सर्कल, सीबीएस आदी भागात रोज वाहतूक कोंडी होत आहे तर दुसरीकडे ठक्कर बाजार बस स्टॅन्ड, जिल्हा शासकीय रुग्णालय भिंतीलागत मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोठी वाहने पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडीला खत पाणी मिळत आहे. अशा वेळेला टोईंग कारवाई सुरू झाल्यास हे मार्ग मोकळे होण्यास मदत होणार आहे.

नाशिक शहरातील वाहतुकीला शिस्त मिळावी तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन व्हावे, या दृष्टीने स्मार्ट सिटी तसेच शहर पोलीस दलाच्या वतीने शहरातील विविध चौकांमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनापासून सीसीटीव्ही यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बसवण्यात आलेल्या 40 सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवणे शक्य होईल. तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तत्काळ मार्ग काढणे सोपे होणार आहे.

सीसीटीव्हीची नजर

वाहतूक सिग्नलवर लाल दिवा असताना वाहनचालकाने हिरवा दिवा सुरू होईपर्यंत थांबणे आवश्यक आहे. सिग्नलवरचे पांढरे झेब्रा पट्ट्यांमागे वाहने थांबवली पाहिजे, अनेक वाहतूक नियम असताना बेशिस्त वाहनचालक मात्र बिनधास्तपणे या नियमांचा भंग करतात. तर दुसरीकडे सिग्नल तोडून स्वतःचा जीवही धोक्यात घालतात म्हणूनच सीसीटीव्हींची विशेष नजर अशा लोकांवर राहणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या