मलेशियात अडकलेले पर्यटक मायदेशी

मलेशियात अडकलेले पर्यटक मायदेशी

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे (Due to travel agent's scam)नाशिक येथील मलेशियात अडकलेले 15 पर्यटक खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी परतले.

नाशिक मधील पर्यटकांना परदेशात आलेली अडचण लक्षात घेऊन खा गोडसे यांनी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि मलेशिया अ‍ॅम्बसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून 15 पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले. मायदेशी परतलेले पर्यटक आज खा.गोडसे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले असता त्यांना गहिवरून आले.

यावेळी खा. गोडसे यांनी आपण काही वेगळे केलं नाही, तुम्हाला मदत करणे हा माझ्या कर्तव्याचाच भाग असून आपण सुखरूपपणे मायदेशी परत आल्याचा मला आनंद झाल्याचे स्पष्ट करून पर्यटकांशी संवाद साधला. सुभाष ओहळे, मिनाक्षीओहळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनिल म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, प्रविण नुमाळे, द्रोपदी जाधव, इंदूबाई रूपवते यांनी शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट मार्फत मलेशिया दौर्‍याची आखणी केली होती.

वरील पर्यटकांना घेऊन एजंट नाशिक येथून हैदराबादला गेला होता. तेथून 19 पैकी चारजणांच्या व्हिसाचे काम अपूर्ण असून तुम्ही विमानाने पुढे चला मी सांयकाळी चौघांना घेऊन मलेशियाला येतो, असे सांगितले. एजंटने पंधरा पर्यटकांना मलेशियाच्या विमानात बसवून दिले. एक दिवस उलटून गेला तरी एजंट मलेशियात पोहचला नाही व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पर्यटकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांच्या प्रश्नांना पर्यटकांकडून सुयोग्य असे उत्तर मिळत नसल्याने पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना केले क्वॉरंटटाइन केले.

पर्यटकांच्या नाशिक येथील नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने खा. हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांर्भिर्य ओळखून खा. गोडसे यांनी लगेचच देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. खा. गोडसे यांच्या पत्राची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मलेशिया अ‍ॅम्बसीला घटनेची माहिती कळवली. ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे हे पर्यटक अडकले असून त्यांचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना लगेचच परत देऊन त्यांना भारतात पाठवावा असे आदेश दिले. त्यानंतर मलेशिया पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट परत करून त्यांना हैदराबादसाठीच्या विमानात बसवून देत मायदेशी पाठविले सर्व पर्यटक नाशिकला पोहचले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com