जिल्ह्यातील पर्यटनस्थळे होणार बंद; करोना आढावा बैठकीत भुजबळांचा इशारा

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे होणार बंद; करोना आढावा बैठकीत भुजबळांचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात करोनाबाधितांची (Corona Patients) संख्या वाढल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. सतत होत असलेल्या करोनाबाधितांच्या लक्षणीय वाढीमुळे शहरासह जिल्ह्यातील गर्दी होत असलेल्या उघड्यावरील पर्यटनस्थळांवर (Tourist Places) बंदी घालण्याचे आदेश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत...

त्यासोबतच शहरातील रामकुंड (Ramkund) येथे धार्मिक कार्यासाठी होत असलेल्या गर्दीचा विचार करता तेथेही शिस्तीचे अधिक पालन होण्यासाठी पोलिसांना (Police) आदेश देण्यात आले आहे. जिल्हधिकरी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, गेल्या २० दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात करोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे अनेक नागरिक करोनाबाधित झाले आहे. या विषाणूचा जास्त धोका नसला तरी संक्रमण होण्याचा दर सर्वाधिक आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे होणार बंद; करोना आढावा बैठकीत भुजबळांचा इशारा
जिल्ह्यात करोनाचा उद्रेक! भुजबळांनी बोलावली तातडीची बैठक

गेल्या २० दिवसात २० पतीने रुग्णवाढ झाली असल्याने जिल्ह्यातील करोना निर्बंधांबाबत फेरविचार करण्यासाठी आज (दि.१४) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करोना आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare), यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. तर अनेक अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.

ऑक्सिजनबाबत (Oxygen) बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्यासाठी ४०२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उद्दिष्ट आहे. सध्या आपली क्षमता ४८६ मेट्रिक टन, आणखी १७७ मेट्रिक टन ऑक्सिजनसाठी प्रयत्न सुरु आहेत.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे होणार बंद; करोना आढावा बैठकीत भुजबळांचा इशारा
नाशकात दिवसभरात दोन हजार करोना पॉझिटिव्ह

यावेळी भुजबळ यांनी ग्रामीण भागात (Rural Area) वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता पिंपळगाव मार्केट, लासलगाव मार्केट यांमुळे निफाडमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली. नाशिक बाजार समितीमध्ये देखील होणारी गर्दी नियंत्रणात आणण्याचे आदेश यावेळी भुजबळांनी दिले.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे होणार बंद; करोना आढावा बैठकीत भुजबळांचा इशारा
'देशदूत'च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना 'गिरणा गौरव' पुरस्कार

शहरातील रामकुंड परिसरात अधिकारी आणि पोलीस तैनात करून गर्दी रोखण्यात यावी तसेच सध्या तरी रामकुंडावरील धार्मिक विधीसाठी भाविकांना कोणतेही निर्बंध नाही मात्र, रुग्ण संख्या वाढल्यास निर्बंध वाढतील याची काळजी घेण्याचेदेखील त्यांनी सांगितले.

गेल्या दोन आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिवसाला हजार ते दीड हजाराच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. नाशिक शहर, निफाड, दिंडोरी तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. निफाड, दिंडोरीसह नाशिक शहरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या व्यक्तींबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात ४८६ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा (Oxygen) साठा करण्याची क्षमता असली तरी प्रत्यक्षात मात्र २८३ मेट्रिक टन ऑक्सिजन आपल्याकडे भरून ठेवण्यात आलेला आहे. आणखी साठवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.