पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा आज इगतपुरी दौरा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा आज इगतपुरी दौरा

घोटी । वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) खंबाळे ग्रामपंचायत ( Khambale Grampanchayat )येथे 1 कोटी 92 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज भेट देणार असून सकाळी 9.30 वाजता इगतपुरी येथील मानस हॉटेल येथे त्यांचे आगमन होणार आहे.

यानंतर खंबाळे येथे डहाळेवाडी येथे 10.20 मिनिटांनी येणार आहेत. त्यानंतर घोटीमधून त्र्यंबकेश्वर येथे दौरा करणार आहे.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. दौर्‍यात आदित्य ठाकरे हे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी खंबाळे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांंनी केले आहे.

Related Stories

No stories found.