पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा शिदवाडीतील ग्रामस्थांशी संवाद

खंबाळे-शिदवाडी शिवारातील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा शिदवाडीतील ग्रामस्थांशी संवाद

जाकीर शेख | घोटी Ghoti

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (State Tourism Minister Aditya Thackeray )नाशिक दौऱ्यावर आले असतांना त्यांचे इगतपुरीचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या घाटनदेवी ( Ghatandevi ) येथे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात इगतपुरी तालुक्यातील खंबाळे ( Igatpuri Taluka- Khambale ) येथील शिदवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधत येथील पाणी प्रश्न जाणून घेतला.

यावेळी शिदवाडी ( Shidwadi ) येथील महिलांनी गावातील समस्यांबाबात चर्चा केली असून ना ठाकरे यांनी तात्काळ येथील पाणी प्रश्न बाबत सक्त सूचना देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

या चर्चेत खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार निर्मला गावित यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान खंबाळे ग्रामपंचायतील तलाव सुशोभिकरणासाठी देखील भरीव निधी देण्यात आला असून या तलावाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले.

.यावेळी येथील एक कोटी ९२ लाखांच्या पाणीपुरवठा योजने बाबत नागरिकांशी पर्यटनमंत्री ना आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी खंबाळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच द्वारकाताई कैलास शिद, उपसरपंच दिलीप चौधरी, ग्रामविकास अधिकारी डी. बी. घडवजे आदींनी देखील चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान यावेळी धरणांच्या तालुक्यात मे महिण्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत असतात. मात्र शाश्वत पाणीपुरवठा योजना कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आज प्रत्यक्षात ना. ठाकरे यांनी शिदवाडी येथील पाणी प्रश्न संदर्भात महिला नागरिकांशी संवाद साधला त्यामुळे येथील पाणी प्रश्न कायमचा मिटेल असा आशावाद माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी व्यक्त केला.

तर माजी आमदार निर्मला गावित यांनी बोलतांना सांगितले की, खंबाळे शिदवाडी येथील पाणी प्रश्नाबाबत आम्ही पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबत चर्चा केली होती. त्यावेळी ना ठाकरे साहेब यांनी सकरात्मक भूमिका घेत येथील पाणी प्रश्न लवकर सुटेल असे आश्वासन दिले त्यामुळे आज प्रत्यक्षात त्यांनी या ठिकाणी भेट दिल्यामुळे येथील पाणी प्रश्न नक्कीच सुटेल अशी आशा या प्रसंगी व्यक्त केली.

या प्रसंगी शिवसेना सपर्क प्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, सुनील बागुल, जिल्हा प्रमुख विजय आप्पा करंजकर, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, उप जिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग बरोरा, नाशिक नगरसेवक विलास शिंदे, तालुका प्रमुख भगवान आडोळे,

उपतालुका प्रमुख कुलदीप चौधरी, माजी तालुका प्रमुख राजेंद्र नाठे, ज्येष्ठ नेते रमेश गावित, माजी सभापती विठ्ठल लंगडे, कावजी ठाकरे, रघुनाथ तोकडे, कचरू डुकर, साहेबराव धोगडे, नंदनलाल भागडे, सुर्यकांत भागडे, रामदास भोर, संजय आरोटे, हिरामण कडु, गणेश काळे, नगरसेविका उज्वला जगदाळे, मथुरा जाधव, अलका चौधरी, नगरसेवक उमेश कस्तुरे, प्रांत तेजस चव्हाण, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक वसंत पथवे आदी उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यातील डहाळेवाडी (खंबाळे) येथील खंबाळे-शिदवाडी शिवारात नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून कामला सुरुवात करावी. पावसाळ्यापूर्वी जॅकवेलची कामे पूर्ण करून पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असणारी जागेबाबत कार्यवाही करावी, असेही मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.