Mi-17V5 हेलिकॉप्टरचे आतापर्यंत झाले आहेत 'इतके' अपघात

Mi-17V5 हेलिकॉप्टरचे आतापर्यंत झाले आहेत 'इतके' अपघात

नवी दिल्ली | New Delhi

बिपीन रावत (Bipin Rawat) ज्या Mi-17V5 हेलीकॉप्टरमधून प्रवास करत होते हते हेलीकॉप्टर रशियन बनावटीचे आहे. भारतासह रशिया इराणसह अनेक देशांकडून या हेलीकॉप्टरचा वापर केला जातो....

अमेरिकेनेही याआधी या हेलीकॉप्टरचा वापर केला होता. अफगाणिस्तान व इराकमध्येही वापर केला जात असल्याचे समजते...

भारतात याच प्रकारच्या हेलीकॉप्टरचा हा चौथा अपघात आहे.

पहिला अपघात : २५ जून २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरानंतर मदतकार्यात सहभागी झालेल्या Mi-17V5 हेलीकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला होता.

दुसरा अपघात : अरुणाचल प्रदेशात Mi-17V5 हेलीकॉप्टरच्या अपघातात सात जण दगावले होते

तिसरा अपघात : Mi-17V5 हेलीकॉप्टरचे केदारनाथमध्ये क्रॅश लँडिंग करावे लागले होते. यावेळी काहीजण जखमी झाले होते.

Mi-17V5 विषयीची माहिती

Mi-17V5 हे आधुनिक बनवतीचे हेलीकॉप्टर आहे. व्हिआयपी स्क्वाड्रनमध्ये या हेलीकॉप्टरचा समावेश होतो.

एप्रिल २०१९ मध्ये Mi-17V5 हेलीकॉप्टरच्या रिपेअरिंग आणि देखरेखीसाठी चंदिगढमध्ये केंद्रही

स्थापन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com