बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे उद्या मार्गदर्शन

लहान मुलांना कोरोना संसर्गापासून रोखण्याबाबत होणार चर्चा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे उद्या मार्गदर्शन
करोना

मुंबई । प्रतिनिधी

लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी उद्या, रविवारी बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी २३ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग् तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. डॉ.सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

हा कार्यक्रम २३ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook - https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युट्यूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ येथे थेट पाहता येणार आहे.

यापूर्वी गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फॅमिली डॉक्टरर्सशी संवाद साधला होता. त्याच धर्तीवर उद्या राज्यातील बालरोग तज्ज्ञांसोबत संवाद साधणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com