आदिवासी बांधवांसाठी टोल फ्री क्रमांक; आज प्रजासत्ताकदिनी अनावरण

आदिवासी बांधवांसाठी टोल फ्री क्रमांक; आज प्रजासत्ताकदिनी अनावरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे कशी मिळवावी,याबाबतच्या माहितीसंदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत टोल फ्री क्रमांकावरून केले जाणार आहे.आदिवासी विकास विभागामार्फत( Tribal Development Department) 1800 2670007 हा टोल फ्री क्रमांक दि. २६ जानेवारी २०२३ अर्थात प्रजासत्ताक दिनापासून सुरु करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.या योजनांचा लाभ मिळण्याकरिता तसेच इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आदिवासी व्यक्तींना शिधापत्रिका,आधार कार्ड,पॅन कार्ड, जमातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असतात.

अनेकदा केवळ या कागदपत्रांच्या अभावी आदिवासी बांधव शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. हीच बाब विशेषत्वाने लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागामार्फत 1800 2670007 हा टोल फ्री क्रमांक येत्या २६ जानेवारी २०२३ अर्थात प्रजासत्ताक दिनापासून सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्याबाबतची माहितीसंदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत या टोलफ्री क्रमांकावरून केले जाणार आहे.

याबाबत मिळेल माहिती आणि मार्गदर्शन

• शिधापत्रिका

• आधार कार्ड

• पॅन कार्ड

• जमातीचा दाखला

• बँकेत खाते उघडणे

• मनरेगा नोंदणी

• आयुष्यमान भारत कार्ड

“एखाद्या कागदपत्राच्या अपूर्ततेमुळे लाभ मिळण्यापासून आदिवासी बांधव वंचित राहू नयेत, यासाठी आमचा आदिवासी विभाग सतत प्रयत्नशील असतो. या टोलफ्री क्रमांकामुळे आवश्यक माहिती आणि कागदपत्रे यांच्याबाबत एका फोनच्या अंतरावर मदत उपलब्ध होणार आहे.”

- नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com