पॅरालिम्पिक : भारताला दुसरे सुवर्णपदक, सुमित अंतिलने केला जागतिक विक्रम

पॅरालिम्पिक : भारताला दुसरे सुवर्णपदक, सुमित अंतिलने केला जागतिक विक्रम

टोकियो

जपानमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic)भारताचा सुवर्ण प्रवास सुरूच आहे. सोमवारी सकाळी नेमबाजीत सुवर्ण (gold medal) मिळाल्यानंतर आता भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. यावेळी भालाफेकमध्ये F64 क्लासमध्ये सुमित अंतिल (Sumit Antil) याने देशाला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. सुमितने ६८.५५ मीटर भाला फेकून सुवर्ण आपल्या नावावर केले. त्याचे हे जागतिक विक्रम झाले आहे.

पॅरालिम्पिक : भारताला दुसरे सुवर्णपदक, सुमित अंतिलने केला जागतिक विक्रम
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

सुमितने सुवर्णपदक जिंकलेल्या स्पर्धेत एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळेस स्वत:चेच वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो सुमितने 66.95 मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने 2019 मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली.

योगेश्वर दत्तला मानले होते आदर्श

योगेश्वर दत्तला आदर्शस्थानी ठेवताना सुमितलाही कुस्तीपटू बनायचे होते. पण, २०१५मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेला अन् त्याला एक पाय गमवावा लागला. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नवल सिंग यांच्या सांगण्यावरून त्यानं भालाफेकीला सुरूवात केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com