बॅडमिंटनपटू कृष्णाला सुवर्णपदक, भारताचे 19 वे पदक

बॅडमिंटनपटू कृष्णाला सुवर्णपदक, भारताचे 19 वे पदक

टोकियो पॅरालिम्पिकच्या (Tokyo Paralympics)अखेरच्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे. भारताला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज दुसरं पदक मिळालं आहे. भारताच्या कृष्ण नागर (Krishna Nagar)यानं एसएच-६ प्रकारात चीनच्या के चू मैन कै याचा पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यामुळे भारताची (India medal)पदक संख्या थेट 19 वर पोहोचली आहे.

कृष्णाने तीन सेट्ममध्ये हा सामना जिंकला. दुसरीकडे भारताचे बॅडमिंटनपटू आणि नोएडाचे DM सुहास यथिराज यांना अंतिम सामन्यात पराभवामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

बॅडमिंटनपटू कृष्णाला सुवर्णपदक, भारताचे 19 वे पदक
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

कृष्णा आणि चू मॅन कई यांच्यातील सामना सुरुवातीपासून अत्यंत चुरशीचा सुरु होता. पहिला सेट 14 मिनिटांमध्ये कृष्णाने 21-17 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कई याने पुनरागमन करत 21-16 च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. पण अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र कृष्णाने कोणतीच चूकी न करता 15 मिनिटांमध्ये सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच कृष्णाने सुवर्णपदक जिंकला. विजयानंतर कृष्णाचा आनंद पाहण्याजोगा होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com