पॅरालिम्पिक : भारताला तिसरे पदक, एकाच दिवसांत दोन पदके

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

टोकियो पॅरालिम्पिक (paralympics)स्पर्धेतून भारतीयांना आनंद देणाऱ्या दोन बातम्या आल्या आहेत. भारताला दोन पदके मिळाली आहे. भारताच्या निषाद कुमारने (Nishad Kumar)चमकदार कामगिरी करत इतिहास रचला. निषादने उंच उडीत देशासाठी रौप्य पदक (silver medal)जिंकलं आहे. आणखी एक भारतीय विनोद कुमारही पदक जिंकले आहे. डिस्क थ्रोमध्ये त्याल पदक मिळाले आहे. महिला टेबल टेनिसच्या क्लास -4 कॅटेगिरीमध्ये भाविनाबेन पटेलने कालच रौप्यपदक पटकावले होते. यामुळे या स्पर्धेत भारताला आतापर्यंत तीन पदके मिळाली आहे.

रॉड्रिक टाउनसेंडने 2.15 मीटर उडी घेऊन अमेरिकेसाठी सुवर्णपदक जिंकले. डॅलसच्या नावावर विश्वविक्रम आहे. त्याचवेळी निषाद कुमारने आशियाई विक्रम केला.

निषादने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन निषादचे अभिनंदन केले आहे. निषाद एक विलक्षण धावपटू आहेत, त्यांनी कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ केला. त्यांचे अभिनंदन… असे ट्विट मोदींनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *