Tokyo Olympics day 4 आज ऑलिम्पिकमध्ये भारत कुठे? जाणून घ्या सर्व माहिती

jalgaon-digital
2 Min Read

टोकिया

टोकिया ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेतील चौथ्या दिवशी तिरंदाजीसह बॅडमिंटन (badminton) आणि बॉक्सिंग (boxing)सह अन्य खेळाच्या मैदानात भारतीय खेळाडू आज आपले नशीब अजमवणार आहे. आज काय सामने आहेत? भारतीय खेळाडू कुठे आहेत? याची माहिती घेऊ या…

पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरलेल्या भवानी देवीने पहिला सामना जिंकून दमदार सुरुवात केली. पण दुसऱ्या फेरीत तिचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. भवानी देवीनं इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला आहे. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू आहे.

टेबल टेनिसमध्ये शरथ कमल याने पोर्तुगालच्या टायगो अपोलोनिया याला 4-2 असे पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

तिरंदाजीत पुरुष सांघिकमधून भारतीय संघ बाहेर, दक्षिण कोरियानं सलग तीन सेट जिंकत मिळवला विजय

बॅडमिंटन : पुरुष दुहेरीतील आव्हानही संपुष्टात इंडोनेशियाच्या जोडीनं सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला केले पराभूत

तिरंदाजीत पुरुष सांघिक प्रकारामधून भारतीय संघ बाहेर, दक्षिण कोरियानं सलग तीन सेट जिंकत भारताचे आव्हान संपुष्टात आणले

तिरंदाजी : भारतीय पुरुष संघ आणि कोरिया यांच्यातील सेमी फायनल लढतीला सुरुवात होणार आहे.

कझाकिस्तानचा 6-2 असा परभव करत पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत भारतानं विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्रवीण जाधव, अतनू दास आणि तरुणदीप राय या संघानं क्वॉर्टर फायनल्समध्ये प्रवेश मिळवला आहे.

सेलिंग: पुरुष गटातील लेसर रेडियल रेस 2 मध्ये विष्णू सर्वानन 20 व्या स्थानावर, तिसरी रेस लवरकच सुरु होणार

बॉक्सिंग : पुरुष मिडलवेट गटात पहिल्या फेरीचा सामना दुपारी 3.06 वाजता (आशीष कुमार).

तलवारबाजी : महिला साबरे प्रकारातील पहिली फेरी पहाटे 5.30 (भवानी देवी).

टेबल टेनिस :

टेबल टेनिसमध्ये भारतानं पोर्तुगालला हरवत बाजी मारली आहे. भारताच्या शरथ कमलनं पोर्तुगालच्या तियागो अपोलोनियाला 4-2 नं पराभूत करुन पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. दुपारी 2.30 पासून तिसऱ्या फेरीचा सामना (मनिका बत्रा)

जलतरण : पुरुष 200 मीटर बटरफ्लाय प्राथमिक फेरी दुपारी 3.50 (साजन प्रकाश)

सेलींग : रेस 3 सकाळी 8.35 ( व्ही. सर्वानन), लेसर रेडीयल रेस 3 सकाळी 11.5 (नेत्रा कुमानन).

हॉकी : महिलांचा दुसरा साखळी सामना जर्मनीविरुद्ध सायंकाळी ५.४५.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *