Monday, April 29, 2024
Homeक्रीडालव्हलिनाचा पंच : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित

लव्हलिनाचा पंच : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित

टोकियो

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला मीराबाई चानूने (mirabai chanu) एक पदक पटकावून दिलं आहे. मात्र लवकरच भारत दुसऱ्या पदकाची कमाई करणार आहे. भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) भारताला अजून एक पदकं निश्चित करून दिलं आहे. शुक्रवारी लव्हलिनाने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव केला आहे.लंडन ऑलिम्पिकमधील पदक विजेती मेरी कोम (mary kom)स्पर्धेतून आउट झाल्यानंतर भारताला दिलासा देणारी कामगिरी नवोदित बॉक्सरने (boxing) करुन दाखवली.

- Advertisement -

देश की बेटी ! दुसऱ्या निश्चित पदकाच्या निमित्ताने…

बॉक्सिंगमध्ये महिला गटातील 69 किलो वजनी गटात पहिल्या लढतीत प्रतिस्पर्धीने माघार घेतल्यानंतर दुसऱ्या लढतीत तिने तिने जर्मनच्या तगड्या अनुभवी नेदिन एपेट्जला पराभवाचा धक्का देत क्वार्टर फायनल गाठली होती. 4 ऑगस्टला ती सेमीफायनलसाठी रिंगमध्ये उतरेल. तिच्यासमोर तुर्कीच्या वर्ल्ड नंबर वन Busenaz Surmeneli या तगड्या बॉक्सरचे आव्हान असेल.

लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनणार आहे. त्यापूर्वी भारताच्या मेरी कोमने 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलं जिंकलं होतं. तर बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला यांच्यात ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय ठरणार आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पटकावलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या