दहावीचा आज निकाल

दहावीचा आज निकाल
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) दहावीचा निकाल ( tenth standard result )आज दि.16 जुलै दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad () यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली .

दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचें लक्ष लागले होते. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे.

राज्यात 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावीच्या परीक्षा होणार होत्या.परंतु करोना पार्श्वभूमीवर 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यांनंतर 10 जुन रोजी मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लावण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.त्यानुसार 23 जुन ते 2 जुलै दरम्यान गुण नोंदवले गेले. त्यावर आधारित आजचा निकाल लागणार आहे.

निकाल कुठे पाहणार?

http://result.mh-ssc.ac.in

www.mahahsscboard.in

कसा पाहाल निकाल ?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या संकेतस्थळावर जावे

त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

त्यानंतर निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

मेसेजच्या माध्यमातूनही 57766 या क्रमांकावर आसनक्रमांक नोंदवूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

राज्यात एकूण विद्यार्थी

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 909931 मुले आणि 748693 मुली अशा एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी आहेत.तर नाशिक विभागात पाच जिल्ह्याचे मिळुन साधारण 201675 विद्यार्थांच्या निकालाचे भविष्य आज कळेल.

असे झाले मुल्यमापन

इ.9 वीचा विषयनिहाय अंतिम निकाल-50 गुण

इ.10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापन -30 गुण

इ.10 वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक परिक्षा, अंतर्गत मुल्यमापन -20 गुण

एकुण गुण- 100 गुण

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com