संदर्भ रुग्णालय नवीन इमारतीचे आज भूमिपूजन

संदर्भ रुग्णालय नवीन इमारतीचे आज भूमिपूजन
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालच्या Sandarbha Seva Hospital नवीन इमारतीचे भूमिपूजन माजी मंत्री पंकजा पंकजा मुंडे BJP Leader Pankaja Munde यांच्या हस्ते आज (दि.1) होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal राहणार आहे. प्रमुख पाहुणे माजी मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार असल्याची माहिती मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे MLA Devyani Farande यांनी दिली.

आ. फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे 105 खाटांचे नवीन रुग्णालय बांधण्यात येणार आहे. नवीन रुग्णालयात महाराष्ट्रात प्रथमच प्लास्टिक सर्जरी, पीडियाट्रिक विभाग न्युरोसर्जन यासह नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग राहणार आहे. एकूण 13.5 कोटी रुपयांचा खर्च या संपूर्ण रुग्णालयाच्या बांधकामासाठी लागणार आहे.

शहरातील गोरगरीब नागरिकांना प्लास्टिक सर्जरी सारखी सुविधा कोणत्याही सरकारी दवाखान्यात आजपर्यंत उपलब्ध नव्हती. गेली पाच वर्ष शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन नाशिक शहरातील गोरगरीब जनतेला प्लास्टिक सर्जरी बरोबर न्युरोसर्जरी, नी रिप्लेसमेंट सुविधा उपलब्ध व्हावी , तसेच गोरगरीब जनतेच्या लहान मुलांना आय सी यु सुविधा देण्यासाठी विधानसभेत घोषणा करून नाशिककारांना निधी उपलब्ध करून दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com