Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालाडक्या बाप्पाला आज निरोप

लाडक्या बाप्पाला आज निरोप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अनंत चतुर्दशीनिमित्त होणार्‍या गणेश विसर्जनाची जय्यत तयारी महापालिकेच्या preparation for immersion by NMC वतीने करण्यात आली आहे. रविवारी मोठया संख्येने घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असल्याने पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून यंदाही 43 ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे कार्यरत असणार आहेत.

- Advertisement -

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाच्या गणेशोत्सवावरही करोनाचे सावट होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने विशेष तयारी केली आहे. 27 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्थळे असून, या ठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच यंदाच्या वर्षी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सहा विभागात टँक ऑन व्हीलची संकल्पना राबविण्यात आली आहे.सहा विभागासाठी बनविण्यात आलेल्या वाहनांची पाहणी आयुक्त जाधव यांनी आज केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी टँक ऑन व्हील या व्यवस्थेचा नागरिकांनी वापर करावा तसेच मनपाच्या वतीने विसर्जनासाठी ऑन लाईन स्लॉट बुकिंगची व्यवस्था महापालिकेच्या संकेतस्थळावर केली असून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा व करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या