नाशिकमध्ये ६ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी केली कोरोनावर मात

आजच्या रुग्ण संख्येत झालेली 4224 वाढ
नाशिकमध्ये ६ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी केली कोरोनावर मात
Corona

नाशिक | प्रतिनिधी

लॉकडाऊननंतर नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी 6137 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यातील ६ हजार १३७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आज जिल्ह्यात ४ हजार २२४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रात 2 हजार 223 तर नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 897 रुग्ण वाढले आहेत. मालेगाव मनपा क्षेत्रात 36 तर जिल्हाबाह्य 68 रुग्णांची आज भर पडली. आज नाशकात 45 रुग्णांनी प्राण गमावले. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक २५ मृत्यू झाले आहेत तर १६ मृत्यू नाशिक शहरातील आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com