Surya Grahan 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज! भारतात दिसणार का? जाणून घ्या….

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

या वर्षभरात एकूण चार ग्रहण (Eclipse) होणार आहे. यात दोन सूर्य ग्रहण (Surya Grahan) तर दोन चंद्र ग्रहण (Chandra Grahan) असणार आहे.

त्यानुसार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे आज (शनिवारी) दिसणार आहे. यावेळी चंद्राचे प्रतिबिंब हे सूर्यावर पडणार असून, सूर्याचा ६४ टक्के भाग हा चंद्रामुळे झाकाळला जाणार आहे. आज होणारे हे ग्रहण आंशिक सूर्य ग्रहण (Partial Eclipse 2022) आहे.

‘श्रुती हसन’चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

हे ग्रहण पृथ्वीवरील काही भागात अंशतःच दिसणार आहे. या ग्रहणामुळे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ दिशेत राहणार नाहीत. त्यामुळे चंद्राच्या बाहेरच्या भागाची सावली फक्त सूर्यावरच पडणार आहे.

हे सूर्यग्रहण भारताच्या वेळेनुसार, ३० एप्रिलच्या अमावस्येच्या रात्री १२:१६ पासून सुरू होईल आणि १ मे रोजी पहाटे ४:०८ पर्यंत राहील. हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका व्यतिरिक्त अटलांटिक प्रदेश, प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिकेच्या नैऋत्य भागात दिसणार आहे.

‘शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

म्हणजेच चिली, अर्जेंटिना, पेरू, उरुग्वे, पश्चिम पॅराग्वे, नैऋत्य बोलिव्हिया, आग्नेय पेरू आणि ब्राझीलचा काही भाग दक्षिण अमेरिकेतही हे ग्रहण दिसणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात भारतात मात्र दिसणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *