जिल्ह्यात आज करोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

दिवसभरात 6 हजार 829 रूग्ण; 9 हजार 564 नवे संशयित; आज २९ बळी
जिल्ह्यात आज करोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

नाशिक । प्रतिनिधी

मंगळवारी करोना पॉझिटिव्हपेक्षा करोनावर मात करणार्‍या रूग्णांची संख्या अधिक झाल्याने दिलासा मिळाला होता पंरतु दुसर्‍याच दिवशी आज एकाच दिवसात पुन्हा एकदा विक्रमी 6 हजार 829 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचाही विक्रम झाला असून कालच्या तुलने 7 हजाराने वाढ होऊन 9 हजार 564 संशयित दाखल झाले आहेत. आज 29 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. मंगळवारी घट होऊन हा आकडा 3 हजार 343 इतका झाला होता. परंतु आज अचानक दुप्पट वाढ झाली आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 43 हजार 801 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 979 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 3 हजार 267 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 6 हजार 829 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 4 हजार 76 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 49 हजार 141 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 585 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 81 हजार 285 झाला आहे. मालेगावात 61 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 9 हजार 981 झाला आहेे. जिल्हा बाह्य 107 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 394 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 15, नाशिक शहरातील 14 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 781 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात यात 7 हजाराची वाढ झाली असून 9 हजार 564 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 9 हजार 165 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 281 तर मालेगाव येथील 86 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,43,801

* नाशिक : 1,49,141

* मालेगाव : 9,981

* उर्वरित जिल्हा : 81,285

* जिल्हा बाह्य ः 3,394

* एकूण मृत्यू: 2,781

* करोना मुक्त : 2,03,267

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com