Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआज कृषी सप्ताहाचा समारोप

आज कृषी सप्ताहाचा समारोप

नाशिक । प्रतिनिधी

खरीप हंगाम ( Kharif Season )2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

तसेच महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणार्‍या कृषीदिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आज दुपारी 12.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे होणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या यूट्यूब वाहिनीवरून होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत 2020 मध्ये रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई यापिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात येवून, प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकर्‍यांचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकर्‍यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत ( Dept of agriculture )करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान घुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी विभागाचे आयुक्त धीरजकुमार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या