Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमोदी सरकारचा आज अर्थसंकल्प : ‘देशदूत’च्या युट्यूब चॅनलवर विश्लेषण

मोदी सरकारचा आज अर्थसंकल्प : ‘देशदूत’च्या युट्यूब चॅनलवर विश्लेषण

deshdoot.com च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला सगळे अपडेट्स मिळत राहतील.

deshdoot.com च्या यू ट्युब चॅनलवरही बजेटचे विश्लेषण पाहता येईल.

- Advertisement -

नवी दिल्लीः

अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावर देशदूतच्या युट्यूब चॅनलवर चर्चा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणार आहेत.

बजेट 2021 वेळ काय?

2021 च्या अर्थसंकल्पातील कामकाज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गेल्या वर्षी म्हणजे 1 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थसंकल्पाच्या वेळी सर्वात प्रदीर्घ भाषण केले होते. ते भाषण जवळपास 2 तास 41 मिनिटे चालले.

2021 बजेट पेपरलेस असेल?

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प 2021 यंदा पूर्णतः पेपरलेस होणार आहे. अर्थसंकल्पीय कागदपत्रे छापली जाणार नाहीत. स्वतंत्र भारतात ही पहिलीच वेळ आहे.

अर्थसंकल्पाचे देशदूतच्या यू ट्युब चॅनलवर विश्लेषण

अर्थसंकल्प संपल्यावर त्याचे देशदूतच्या यू ट्युब चॅनलवर लाईव्ह विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यात नरेद्र गोसावी, विशाल पोद्दार, इनोवा रबरचे आंबेकर, श्री. शिंदेकर, अनिल आहेर, ज्ञानेश्वर वाकचौरे सहभागी होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या