भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज नाशकात

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज नाशकात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) हे अध्यक्ष झाल्यांनतर पहिल्यांदाच नाशिक दौर्‍यावर येत असून त्यांच्या स्वागताची नाशिक महानगर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातर्फे जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती भाजपा महानगर अध्यक्ष गिरीष पालवे व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.

त्यांच्या स्वागतासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि.11 सप्टेंबर रोजी, सकाळी. 8.30वा. बाईक रॅलीला सुरुवात होऊन नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा - सुभाष रोड - अनुराधा समोरुन - बिटको चौक - नाशिककडे - काठे गल्ली सिग्नल चौकातून - मुंबई नाका - कालिका मंदिर येथे समारोप होणार आहे.

यानंतर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगर / ग्रामीण जिल्हा संघटनात्मक बैठक दुपारी. 12.00 ते 02.00 वाजेपर्यत स्प्लेंडर हॉल, राजीव नगर, मुंबई आग्रा हायवे सर्विस रोड, नाशिक येथे आयोजित केली आहे.

तसेच कालिदास कला मंदिर येथे दुपारी 2.30 ते 4. या कालावधीत सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सांयंकाळी 6.30 ते 7.15 वा. पंचवटी कारंजा, नाशिक युवा वॉरियर्स शाखा उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com