काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज पुन्हा चौकशी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज पुन्हा चौकशी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

ईडीने ( ED ) मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया ( Congress president Sonia Gandhi )गांधी यांची तब्बल 6 तास चौकशी केली. त्या सकाळी 11 वा. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. त्यांची 2 फेर्‍यांत चौकशी झाली.

ईडीने त्यांना आज बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. दुसरीकडे, सोनियांच्या चौकशीविरोधात काँग्रेस खासदारांसह राहुल गांधींनीही राजधानीतील विजय चौकाजवळ धरणे आंदोलन केले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांचाही आंदोलनात सहभाग होता. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com