जिल्ह्यात दिवसभरात १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १७१ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ( Corona Positive Patients ) संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १७१ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ५८ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आज जिल्ह्यात ०४ रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patietns ) आहे. यात ग्रामिण भागातील ०४ रूग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ४२४ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com