Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआश्रमशाळ विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी 'या' तारखेला

आश्रमशाळ विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी ‘या’ तारखेला

नाशिक | प्रतिनिधी

आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षमता चाचणीचा उपक्रम यंदाही राबविण्याच निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजीची क्षमता चाचणी २९ ऑगस्टला घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

चार विभागांतील दोन लाख ७६ हजार ७१३ विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर ही चार अपर आयुक्त कार्यालये आणि ३० प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ४९९ शासकीय आणि ५४६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात.

सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी समजून घेण्यासाठी व त्यावरील उपचारात्मक अध्ययन यासाठी आदिवासी विकास विभाग सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजी विषयाची क्षमता चाचणी घेेणार आहे. सर्व ठिकाणी प्रश्नपत्रिका सारखीच असणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात तीन क्षमता चाचण्या घेण्याचे नियोजन आहे. यातील येणार्‍या निकालाआधारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

नाशिक आयुक्त, ठाणे अपर आयुक्त, अमरावती अपर, आयुक्त नागपूर अपर आयुक्त, शासकीय शाळेतील विद्यार्थी (पाचवी ते दहावी) नाशिक आयुक्त ५८ हजार ६६ ३९ हजार ४७४ २५ हजार ३३ १४ हजार ३६४ अनुदानित शाळेतील विद्यार्थी (पाचवी ते दहावी) ६७ हजार ३१८ २४ हजार ८५६ २९ हजार ८५ १८ हजार ५१७ विद्यार्थी ही चाचणी देणार आहे.

विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीमुळे कोणता विद्यार्थी नेमका कुठे मागे पडतोय, हे समजण्यास मदत होईल, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मागे पडलेल्या अध्ययन क्षमतेवर काम करणे शिक्षकांना सोपे होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासही मदत होईल. असे आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यानी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या