Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये मतभेद? TMC चा मोठा निर्णय

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये मतभेद? TMC चा मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणित (BJP) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांचा अपेक्षेप्रमाणे आज दणदणीत विजय झाला.

- Advertisement -

द्रौपदी मुर्मू यांना एकूण मतांच्या ६४ टक्के, तर ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना ३६ टक्के मते मिळाली. दरम्यान राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधक एकजूट राहू शकले नाहीत, हे द्रौपदी मुर्मू यांच्या मोठ्या विजयाने स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही विरोधी पक्षांमध्ये चुरस आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. टीएमसीने एनडीए किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, अल्वा यांचे नाव लोकशाहीपद्धतीने निवडण्यात आले नाही, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तृणमूलच्या अनेक खासदारांचे देखील हेच मत असल्यामुळे पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या