गोदावरीतील फरशा यंदाही गेल्या वाहून

गोदावरीतील फरशा यंदाही गेल्या वाहून

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

यंदा अवघा 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग (Water discharge) झाल्याने स्मार्ट सिटीने (Smart City) गोदा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली बसविलेल्या फरशा (Tiles) वाहून जाण्याची पुनरावृत्ती घडली आहे. वास्तविक या फरशा लावण्यासाठी अनेकदा नाशिककरांकडून विरोध होत असला तरी देखील स्मार्ट सिटीने हे काम रेटून नेले होते.

गेल्या वर्षी देखील थोड्या पावसाने फरशा वाहून गेल्याचे चित्र दिसून आले होते. त्यावेळी देखील अनेकांनी विरोध केला. मात्र कोणत्याही विरोधाला जुमानता स्मार्ट सिटी कंपनीने (Smart City Company) फरशी लावण्याचे काम सुरूच ठेवले होते याबाबत नाशिककरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या शहराच्या सौंदर्याच्या नावाखाली गोदावरीच्या (godavari) पात्रात पुरातन दगडावर नवीन फरशी बसवण्याबाबत स्मार्ट सिटी कंपनीने (Smart City Company) धोरण निश्चित केले होते.

सुरुवातीला याला विरोध देखील झाला होता; मात्र विरोधाला न जुमानता कंपनीने हे काम सुरूच ठेवले होते. यासाठी वापरण्यात येणारा दगड, त्याची जाडी ही नियमात न बसवता नियमबाह्य असल्याचे देखील अनेक तज्ज्ञांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. फरशा बसवल्यामुळे चार ते पाच इंचाने पुराच्या पाण्याची पातळी (Flood water level) वाढल्याचे देखील चित्र यावेळी स्पष्ट झाले. स्मार्ट सिटीचा हा मनमानी कारभार थांबणार आहे की नाही अशा भावना नाशिककर व्यक्त करत आहे.

पुरातत्व विभागाचा घेणार सल्ला

पुरातन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एका मंदिराच्या पायर्‍या बसवण्यासाठी तोडण्यात आल्या होत्या. ही बाब पुरातत्व विभागाकडे गेली असता त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला नोटीस देखील बजावली होती. त्यावर स्मार्ट सिटीने पायर्‍या पुन्हा बसवण्यात येतील असे उत्तर दिले होते. या पुरात ते देखील वाहून गेल्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

देशदूतच्या मंचावर तज्ज्ञांच्या भावना

स्मार्ट सिटीच्या गोदा सौदर्यीकरण या अंतर्गत गोदा पात्रात बसविण्यात येणार्‍या फरशाबाबत देशदूतच्यावतीने संवाद कट्टा घेण्यात आला होता. यामध्ये याविषयीच्या तज्ञांनी आणि गोदाप्रेमी याची आवश्यकताच नसल्याचे नमूद केले होते. तसेच याची आवश्यकता नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com