Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याप्रवाशांसाठी खुशखबर! इगतपुरी रेल्वे स्थानकात मिळणार 'या' मेल-एक्सप्रेसची तिकिटे

प्रवाशांसाठी खुशखबर! इगतपुरी रेल्वे स्थानकात मिळणार ‘या’ मेल-एक्सप्रेसची तिकिटे

मुंबई | Mumbai

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) येथे केवळ तांत्रिक थांबा असलेल्या मेल-एक्सप्रेस (Mail-Express) गाड्यांना आता कमर्शियल हाल्ट (Commercial Halt) मिळणार आहे. याआधी इगतपुरीतील रेल्वे स्थानकावर (Igatpuri Railway Station) केवळ गाड्या थांबत होत्या. मात्र, सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना त्यांचे तिकीट येथून काढता येत नव्हते. परंतु, आता याठिकाणाहून तिकीटे काढता येणार असल्याने इगतपुरीकरांना येथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाता येणार आहे…

- Advertisement -

Nashik Accident News : ट्रेलरखाली दबून दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

इगतपुरी हे मुंबई, नाशिक व इतर शहरांच्या कनेक्टिव्हिटीसाठी मध्य रेल्वेचे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. इगतपुरीशी महाराष्ट्र व देशातील अनेक शहरे रेल्वेने जोडली गेली आहेत. पंरतु, इगतपुरीला अनेक रेल्वे गाडयांना प्रत्यक्ष थांबा असूनही १७ गाड्यांना तिकीट बुकिंगची सोय नव्हती. मात्र,आता एकूण सतरा मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची तिकीटे इगतपुरीच्या तिकीट खिडक्यांवर खरेदी करता येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

दरम्यान, इगतपुरी रेल्वे स्थानकावरून मुंबई, ठाणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर इत्यादी शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर हैदराबाद, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश व इतर राज्यांमधून देखील येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची (Passengers) संख्या अधिक आहे. त्यामुळे या सेवेचा फायदा स्थानिक नागरिक, व्यावसायिक, कामगार, शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या