Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू

ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर कालव्यात कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू

पंढरपूर | Pandharpur

येथील करकंब परिसरात (Karkamb Area) मंगळवारी रात्री (दि,१३) रोजी ११ वाजेच्या सुमारास ऊस तोड कामगारांच्या (Sugarcane Workers) ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात (Accident) घडला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त मजूर हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरने ऊसाच्या फडात जात होते. यावेळी ट्रॅक्टर करकंब परिसरात आला असता चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट उजनी कालव्यात (Ujani Canal) कोसळला. या घटनेत तीन ऊसतोड महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला असून हे सर्व मजूर मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. तसेच या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या