पेठनजीक तीन वाहनांचा विचित्र अपघात

पेठनजीक तीन वाहनांचा विचित्र अपघात

पेठ | वार्ताहर Peth

पेठ शहरानजीकच्या हट्टीपाड्याजवळ नव्यानेच तयार केलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यामुळे नाशिककडून गुजरातकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे....

नाशिककडून गुजरातकडे जाणारी पिकअप एमएच १७ बीवाय २४४१ क्रमांकाच्या गाडीस पाठीमागून येणारी मालट्रक क्र. केए ०१. एजे९८५८ याने खड्डा चुकविण्याच्या नादात धडक दिली.

रासायनीक पिंप भरलेली पिकअप रस्त्यावरच उलटली. ट्रक चालकाने अपघातस्थळावरून पलायन केले.

पिकअप रस्त्यावरचा उलटल्याने काही वेळातच नाशिक कडून येणाऱ्या दुसरा तिरुपती रोड लाइन्सचा ट्रक क्र. एम एच १३ सीयु ८१८४ हा वेगात असल्याने अपघातग्रस्त पिकअपला धडकून तोही उलटला.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तिनही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने प्राणहाणी टळली असली तरीही अल्प कालावधीत रस्ते उखडून जाऊन खड्डे पडत असल्याने रस्त्यांचे दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com