रासबिहारी-मेरी लिंक रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रासबिहारी-मेरी लिंक रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील महत्वाचा लिंक रोड असलेल्या रासबिहारी-मेरी रस्त्यावर (Rasbihar-Meri Road) तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...

एक मालवाहू पिकअप वाहन भरधाव वेगाने जात असताना चालकाने नियंत्रण सुटल्याने वाहन दोन धावत्या कारवर जाऊन आदळले. यानंतर पीक अप वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले.

पीक अप वाहनचालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी म्हसरूळ पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

दरम्यान, मेरी लिंक रोड अरुंद असल्यामुळे या ठिकाणी सततचे अपघात होत असतात, यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com