मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात

पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात

सिन्नर | Sinnar

नाशिक-सिन्नर महामार्गावर मोदरी घाटात सायंकाळी पाचच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात नाशिक येथील एका नामांकित महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

नाशिक येथील एका नामांकित महाविद्यालयामधील 8 ते 9 विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले.

त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडर वरून पलटी घेत सिन्नरकडे येणाऱ्या इनोवा व स्विफ्ट कारवर येऊन धडकली. यामुळे कारमधील हरीश बोडके, सायली पाटील, शुभम ताडगे व अन्य दोन (अद्याप नवे समजू शकले नाही) विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य दोन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

काही जखमींना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com